उरण : वार्ताहर
33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019चे शिवसेना-भारतीय जनता पक्ष-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्प्पा) बारणे यांना विजयी करण्यासाठी उरण तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून प्रचार करताना कार्यकर्ते दिसत आहेत. उरण तालुक्यातील म्हातवली-नागाव गावात नुकतीच पत्रके वाटण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे पश्चिम विभागप्रमुख एस. के. पुरो, उपविभागप्रमुख रवींद्र पडते, म्हातवली शाखाप्रमुख विष्णू पाटील, नागाव शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, अमित नाईक, संतोष लवेकर, म्हातवली उपशाखाप्रमुख भरत थळी, माजी शाखाप्रमुख म्हातवली शेखर पडते, भाजप म्हातवली गाव अध्यक्ष अभय घरत, भाजप कार्यकर्ते समीर कुथे, जगदीश म्हात्रे, नागाव उपसरपंच मोहन काठे, नागाव ग्रामपंचायत सदस्य केशव भोईर, नाना गायकवाड, सुनील फेगडे आदी सहभागी झाले होते. नागाव आणि म्हतावली येथील म्हातवली, पोपुड, नाईकनगर, घोसपाडा, पिंपळवाडी, काठेआळी, वारीकआळी, चिंबळखळी, मोठे नागाव, छोटे नागाव, पोखरण गल्ली, आदिवासी वाडी, पिरवाड, अंबिका वाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पत्रके वाटून महायुतीचा जोरदार प्रचार करण्यात आला. आपले मत मोदी सरकारला म्हणजे देशाला होय, असे शिवसेनेचे पश्चिम विभागप्रमुख एस. के. पुरो यांनी सांगितले.