मुंबई ः प्रतिनिधी
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला, असा सवाल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात एकाच वेळी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर आहेत, तर भाजप नेते किरीट सोमय्या हेही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. अशातच सोमय्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला? सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला, ईडीला, भाजपला की किरीट सोमय्यांना? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांनाही अटक झाली, आनंद अडसूळ यांनादेखील अटक झाली, महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच, असे सांगत सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.