
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छ भारत अभियानंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरा मुक्त शहरांसाठीचा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमत केंद्रिय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या हस्ते पनवेल महापालिकेस सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सोमवारी (दि. 22) पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या वेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, सुनिल माळी, जवाद काझी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper