पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अनेक विकासकामे सुरू असून त्या कामांना वेग आला आहे. अशाच प्रकारे शनिवारी (दि. 19) शिरवली येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभूमीलगत सरंक्षण भिंत तसेच चिंचवली येथे रस्ता डांबरीकरण ही 24 लाख रुपयांची कामे सुरू झाली. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या झाले.
पनवेल तालुक्यातील शिरवली गावात हनुमान मंदिर ते पाणवटा रस्ता काँक्रिटीकरण, गावातील स्मशानभूमीलगत संरक्षण भिंत बांधणे तसेच चिंचवली स्मशानभूमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून होत आहे. या कामांचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या कार्यक्रमांना भाजप नेते एकनाथ देशेकर, सरपंच रखमाबाई बोंडे, दीपक बोंडे, भालचंद्र सिनारे, परशुराम चोरघे, अशोक पाटील, प्रकाश बोंडे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग जाधव, परशुराम रिकामे, लहू मुंडे, कृष्णा बोलाडे, संतोष मुंडे, शिवाजी पाटील, शिवाजी ठोंबरे, फुलचंद पाटील, भालचंद्र मुंडे, किसन सिनारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper