खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खालापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 23 डिसेंबर रोजी होत असून, सदस्यपदासाठी एकूण 68 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि.13) अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापुर्वी 23 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता सदस्यपदाच्या 16 जागांसाठी 45उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. खालापूर नगरपंचायतीच्या 17 पैकी एक प्रभाग ओबीसीसाठी राखीव होता. परंतु त्या ठिकाणी स्थगिती आल्यामुळे सोळा प्रभागात निवडणूक होणार आहे. भाजप, मनसे आणि शेकाप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper