कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील भाजपच्या कार्यालयामध्ये भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मेवाटप शिबिर आयोजित केले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये 280 नागरिकांनी डोळे तपासणी करून घेतली. या शिबिराचे उद्घाटन कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले. शिबिराच्या सांगता समारंभाच्या वेळी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, शहर सरचिटणीस दिलीप बिस्ट, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, देविदास खेडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सर्व कर्मचारी व डॉक्टर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बबन बारगजे यांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.