पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे बंद असलेले पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार अखेर उघडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातही बुधवारी (दि. 15) हे वर्ग भरले.
पनवेल परिसरात महापालिका आयुक्त गणेश देशमुख, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आयुक्तांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्येही भेट दिली. या शाळेत येणार्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून व त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी सीबीएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे, स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे रायगड जिल्हा पीआरओ बाळासाहेब कारंडे, उलवे येथील शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर आदी उपस्थित होते.