Breaking News

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना

विराट मात्र फोटोंमधून गायब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या संबंधीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहली या फोटोंमध्ये दिसत नाही. भारतीय संघ दौर्‍यावर जात असेल आणि बोर्डाकडून खेळाडूंचे फोटो काढले जात असतील, पण कर्णधारच या फोटोंमध्ये नाही, असे आतापर्यंत घडताना दिसले नाही.

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने बुधवारी (15 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर कोहली विरुद्ध बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली असा नवा वाद सुरू झाला आहे. गांगुली म्हणाले होते की, मी आणि निवड समितीने कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत बोललो होतो, पण निवडी समितीने बैठकीमध्येच त्याला यापुढे एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार नसशील, असे कळवले होते, असे विराटने म्हटले.

विराटच्या या वक्तव्यानंतर कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे, असा वाद सुरू झाला आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याला असे वाटते की, कोहली, रोहित आणि बीसीसीआय यांच्यात सध्या जे काही वाद आहेत, ते सर्व लवकरात लवकर सोडवले जावेत आणि याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये.

बीसीसीआय आणि विराटमध्ये नक्कीच वाद असल्याचे गेल्या काही दिवसातील अनेक गोष्टींवरून दिसून आले आहे. आता बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवाल हे खेळाडू दिसत आहेत, पण विराट कोहली कुठेही दिसत नाही. त्यामुळे शंकेला जागा आहे.

भारतीय संघ 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये, तर तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाईल. पहिले दोन एकदिवसीय सामने 19 आणि 21 जानेवारीला पार्ल येथे खेळवले जातील, तर तिसरा एकदिवसीय सामना 23 जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. ओमायक्रॉन विषाणूमुळे चार टी-20 सामन्यांची मालिका स्थगित करण्यात आली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply