Breaking News

बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक

पनवेल ः वार्ताहर

रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या बैठकीला कार्याध्यक्ष मारुती आडकर, उपाध्यक्ष किशोर देवधेकर, जॉईन्ट सेक्रेटरी किशोर नारकर, सुनील नांदे, खजिनदार राजेश अनगत, ऑर्गनायझर सेक्रेटरी जगदिश अगिवले, सल्लगार रवींद्र इथापे, अ‍ॅड. शशिकांत मुंडे, सहखजिनदार राजेश थेटे, सदस्य रूपेश ठाकूर, महेश खरात, मयूर कदम आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply