Breaking News

रायगडच्या सॉफ्ट टेनिस संघांची निवड

पनवेल ः वार्ताहर

महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत जळगाव जिल्हा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नववी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा  6 ते 9 जानेवारीदरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस संघाच्या निवड चाचणीचे आयोजन नुकतेच खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल  येथे करण्यात आले होते. या वेळी रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीताताई पाटील, सचिव स्वप्नील वारंगे, खजिनदार हेमंत पयेर, स्पर्धा प्रमुख मंदार मुंबईकर उपस्थित होते.

या निवड चाचणीतून निवड झालेले प्राविण्यप्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

वरिष्ठ गट पुरुष संघ ः अश्विन प्रभू, आरूष निट्टुरे, निशांत गायकवाड, यशपाल चौधरी, नारायण सब्रमणी, सिद्धेश कारंडे, आकाश कदम, यश वारके.

वरिष्ठ गट महिला संघ ः प्रतीक्षा शेरकर, दीक्षा वालवे, काजल मंडळ, श्रावणी केसकर, श्रुती बोणे, फाल्गुनी ढकोलिया.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply