धाटाव : प्रतिनिधी
दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा वाढदिवस रोहा तालुक्यात रविवारी (दि. 9) ई-श्रम कार्ड योजना, विविध आदिवासी भागात ब्लँकेट वाटप, रोहा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण रुग्णालयात फळे, तसेच भुनेश्वर आदिवासी वाडी येथे मास्क, चटई, मेणबत्ती वाटप करण्यात आले. युवा मोर्चा चिटणीस नरेश कोकरे यांनी कारिवणे व धनगरवाडी येथे ब्लँकेट वाटप केले.
दक्षिण रायगड युवा मोर्चा व राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड योजना दि. 9 ते 13 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतमजूर, वृत्तपत्रे वाटप, रिक्षाचालक, सुतार, बांधकाम यांसारखे अनेक छोटे व्यवसाय व उद्योगधंदे कामगार ज्यांची शासनाकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही अशा लोकांना एक ओळख म्हणून ई-श्रम कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना होईल. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजेश डाके व राजमुद्रा फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष राजेश भगत यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper