रेवदंडा : प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार चौल मुखरी गणपती मंदिर सभागृहात लसीकरणाला शुक्रवारी (दि. 7) सुरुवात झाली आहे. हे लसीकरण चौल अश्विनी रुणालय, चौल ग्रामपंचायत यांच्या अथक परिश्रमाने होत आहे.
चौल ग्रामपंचायतीच्या वतीने अश्विनी रुग्णालय चौल यांचे सहकार्य व परिश्रमाने यापूर्वी चार हजार लसीकरणाची पूर्तता झाली आहे. त्या वेळी चौल तसेच परिसरातील रेवदंडा, थेरोंडा, आग्राव, देवघर, वरंडे, सराई, आंदोशी आदी भागातून लसीकरणाला मोठा प्रतिसाद लाभला होता. या वेळीही चौल ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे तीन हजार लसीकरणाचे ध्येय ठेवले असून शुक्रवारी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, चौल सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, मारुती भगत, ग्रा.पं. सदस्य अतुल वर्तक, निलेश नाईक, अजित मिसाळ, रूपाली म्हात्रे, ग्रामसेवक सुनील महाजन, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू वर्तक, महेंद्र घरत, अश्विनी रुग्णालयाचे कर्मचारी, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.