लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
गव्हाण : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कल्पक माणिक घरत याला सन 2021 या वर्षासाठीची शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. रायगड जिल्ह्याच्या यादीत कल्पकने 206 वा क्रमांक प्राप्त करून तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.
कल्पक घरतच्या या यशाबद्दल जभशिप्र संस्थेचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जभशिप्र संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कल्पकचे आजोबा काशिनाथ घरत, वडील माणिक घरत उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी कल्पक व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
कल्पक हा रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील प्रा. माणिक घरत यांचा चिरंजीव आहे. त्याला या विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख संपदा म्हात्रे, ऊर्मिला गोंधळी, राजश्री म्हात्रे, प्रणाली पाटील, उज्ज्वला म्हात्रे, चारुशीला ठाकूर, प्रमोद कोळी, द्रौपदा वर्तक आदी अध्यापकांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रणिता गोळे, शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख पर्यवेक्षक अरुण जोशी व सर्व अध्यापकांचेही विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कल्पकच्या या यशाबद्दल त्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जभशिप्र संस्थेचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत जुनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन भार्गव ठाकूर, विद्यालयाच्या प्राचार्या प्रणिता गोळे, अरुण जोशी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, प्रा. बाबूलाल पाटोळे आदींनी अभिनंदन केले आहे.