Breaking News

श्रीवर्धन तालुक्यात पोषण आहाराचा भेसळयुक्त कारभार

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यातील अंगणवाडी तर्फे गरोदर माता व मुलांना भेसळयुक्त निःकृष्ठ दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यामुळे महिला व बालविकास कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता व लहान मुलांना आंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. परंतु श्रीवर्धन तालुक्यातील आंगणवाड्यांत सहा-सहा महिने उशीराने पोषण आहार येतो. हा पोषण आहार भेसळयुक्त व निःकृष्ठ दर्जाच्या असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. पोषण आहाराचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला दिल्यापासून मनमानी कारभार सुरू आहे, असे स्थानिक प्रतिनिधी व सरपंच यांचे म्हणणे आहे.

आम्हाला वरच्या विभागाकडून जो पोषण आहार पाठवला जातो, त्याचेच आम्ही वाटप करतो, असे अंगणवाडी शिक्षिकांनी सांगितले.

तालुक्यात पोषण आहाराचे वेळेवर वाटप होत नाही. लाभार्थ्यांनी जी पोषण आहाराची पाकीटे फोडली तेंव्हा त्यात मका, खडे यांची भेसळ होती.

-विपुल रमेश गोरिवले, सरपंच, दिघी, ता. श्रीवर्धन

पोषण आहार पाकीटे आली तेंव्हा व्यवस्थीत होती. ज्यांना वाटप केली, त्यांनी ही पाकीटे व्यवस्थीत ठेवली नाहीत.

-अमिता भायदे, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, श्रीवर्धन

जिल्ह्यातून जी पोषण आहाराची पाकिटे येतात ती तपासण्याची आम्हाला परवानगी नाही. त्यामुळे जशी पाकिटे येतात तशीच आम्हाला वाटप करावी लागतात.

-उद्धव होळकर, गटशिक्षण अधिकारी, श्रीवर्धन

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply