Breaking News

उरण मतदारसंघात जोरदार तयारी

उरण ः प्रतिनिधी

उरण विधानसभा मतदारसंघात 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, उरण नगर परिषदेसह उरण तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ, पनवेल तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघ व खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदारसंघातील एक लाख 46 हजार 25 पुरुष आणि एक लाख 44 हजार 248 महिला असे एकूण दोन लाख 90 हजार 273 मतदार उरण विधानसभा

मतदारसंघातून आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण उरण मतदारसंघात 339 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्वाचन अधिकार्‍यांसह पाच कर्मचारी, त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलीस कर्मचार्‍याच्या नेमणुकीसह एकूण दोन हजार 34 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 339 मतदान केंद्रांपैकी पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील 55 ते 59 अशी पाच मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती उरण विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपा भोसले यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply