पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्रातील मोदी सरकार सबका साथ, सबका विकास हे सूत्र राबवून प्रत्येक घराघरापर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवत आहे. यामुळेच सर्वसामान्यांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी मोठी आस्था निर्माण झाली असून, जेव्हा तुमच्यासारखे सहकारी भाजपसोबत जुडले जातात, तेव्हा आम्हाला मोठी ताकद मिळते. तुमच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची शक्ती आणखी वाढली आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी केवाळे येथे व्यक्त केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत केवाळे येथील अनेक पदाधिकार्यांनी भाजपच्या विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. येत्या 5 तारखेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीला सामोरी जात असून नेरे जिल्हा परिषद गटासाठी आत्माराम भस्मा आणि आदई पंचायत समिती गणासाठी भूपेंद्र पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. आपली निशाणी कमळ असून, या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्याला संपूर्ण ताकद लावायची आहे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवाळे येथील योगेश माळी, राजाराम माळी, गोटीराम गायकर, शंकर डांगरकर, दत्तात्रेय माळी, बळीराम गायकर, दिनेश माळी, आत्माराम माळी आणि किसन गायकर यांच्या प्रयतकतून माजी सरपंच शाळीक नारायण माळी, अण्णा माळी, ग्रामपंचायत सदस्य हिरामन भगत, राजेश माळी, भरत भोईर, भारती भोईर, जना निरगुडा, अशोक माळी, सुनील माळी आणि विघ्नेश पालकर यांच्यासह अनेक समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस यतीन पाटील, सरपंच सचिन पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, रवींद्र जोशी, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपचे पारडे जड झाले असून निवडणुकीच्या प्रचाराला आता मोठी गती मिळणार आहे.
Check Also
शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे
भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …
RamPrahar – The Panvel Daily Paper