Breaking News

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन युती करण्याची त्यांची तयारी असते. मात्र, जनतेचा विश्वास केवळ भारतीय जनता पार्टीच्या विकासकामांवर आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल आणि विकासाचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकीसाठी महायुतीने उरणमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली असून, चिरनेर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवेंद्र पाटील आणि आवरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समिधा म्हात्रे यांच्या प्रचाराचा नारळ उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आवरे येथे फोडण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परेश ठाकूर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या मविकासाच्या कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला आता शाब्दिक आश्वासने नको तर ठोस विकास हवा आहे, जो केवळ भाजपच देऊ शकते. विकासकामांची ही गती कायम राखण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या प्रचार शुभारंभाला भाजप जिल्हा कमिटी सदस्य निलेश म्हात्रे, उरण ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, सारडे सरपंच रोशन थळी, तालुका उपाध्यक्ष मुकेश म्हात्रे, विभागीय अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply