Breaking News

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा झाला असून, या योजना त्यांच्या जीवनात समृद्धी आणत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यातील वावंजे येथे आयोजित लाडकी बहीण मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही केले. वावंजे येथे रविवारी झालेल्या या मेळाव्यात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपल्या परिसराचा विकास वेगाने होत असून नवनवीन उद्योग आणि रस्ते प्रकल्पांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. भारतीय जनता पार्टीने नेहमीच शेतकरी आणि स्थानिकांच्या हिताचे रक्षण केले आहे. मग तो एमआयडीसीचा प्रकल्प असो वा रस्त्यांचा, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी पक्ष नेहमीच दक्ष राहिला आहे आणि भविष्यातही या प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा स्थानिकांनाच मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. तसेच येणार्‍या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदात होणार आहे. या निवडणुकीत वावंजे जिल्हा परिषदेसाठी कमला देशेकर आणि वावंजे पंचायत समितीसाठी आरती काठे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना मकमळफ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ दिशेकर, नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, दिनेश खानवकर, संतोष पाटील, शिवाजी दुर्गे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद दवळे, डॉक्टर मोतीराम कोळी, नाथा आगलावे, कृष्णा पाटील, जनार्दन आगलावे, काजल पाटील, अरुणा दाभणे, दिलीप वास्कर, महेश पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र गोंधळी, चंद्रकांत गोंधळी, प्रभाकर पाटील, सुरेश पोरजी, अंकुश पाटील, वासुदेव चोरमेकर, कैलास मढवी, सज्जन पवार, रमेश मते, गोमा पाटील, संजोग पाटील, भागर्व सांगडे, बाळकृष्ण पाटील, निवृत्ती पाटील, अमर ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply