पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन व खार बंदिस्त फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच रजनी हिरामण ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाकडे सरपंच रजनी ठाकूर …
Read More »खांदा कॉलनीत आधार कार्ड, आभा कार्ड शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 6) खांदा कॉलनीवासीयांसाठी आधार कार्ड तसेच केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये खांदा कॉलनीतील असंख्य गरीब गरजू व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घेतला. भाजप पुरस्कृत …
Read More »आसुडगावमधील जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल …
Read More »पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तरुणाची हत्या
पनवेल ः वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून …
Read More »माडभुवनवाडी पुन्हा गजबजली
मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या …
Read More »मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव कारच्या धडकेने मृत्यू
पनवेल : वार्ताहर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारने धडक दिल्याने सदर ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खारघर, सेक्टर- 35 मध्ये घडली. खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या महिला कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातात मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव नंदकुमार उग्रमोहन सिंग (वय …
Read More »समाजहितैषी!
समाजसेवी व्यक्तिमत्त्वं जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणिवादेखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यावर याची मनोमन साक्ष पटते. जनहिताचा कळवळा आणि विकासाची तळमळ असलेल्या या नेत्याने आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे… जनमानसात आदराचे स्थान …
Read More »उरणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
भटक्या कुत्र्यांनी घेतला 13 नागरिकांना चावा बांधपाडा-खोपटे गावातील रहिवासी भयभित उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना काल रविवारी घडली आहे. या सहा जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे उपचार घेत आहेत. तर सात नागरिक उपचार घेऊन घरी …
Read More »माडभुवनवाडीचे लवकरच पुनर्वसन करणार
आमदार महेश बालदी यांचे ग्रामस्थांना आश्वासन प्रक्रिया जलद राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार प्रशासनाने तत्काळ दखल घेत माडभुवनवाडीचे स्थलांतर करण्यात आले. यानंतर आमदार …
Read More »इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश
मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper