Breaking News

आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा : पाकला नमवून भारत अंतिम फेरीत

रंगून : वृत्तसंस्था

भारताच्या 23 वर्षांखालील संघाने म्यानमार येथे सुरू असलेल्या आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर 21-25, 25-16, 25-22, 25-18 असा विजय मिळवला. त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. यासह भारताने 23 वर्षांआतील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावल्यावर पाकिस्तानला 21-25, 25-16, 25-22, 25-18 अशी मात दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर कोणत्याही खेळात भारत-पाकची ही पहिलीच लढत होती. तिसर्‍या सेटमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानकडे 21-20 अशी आघाडी होती, परंतु त्यांचे तीन फटके बाहेर गेले आणि भारताने 25-22 अशी बाजी मारली.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply