आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. त्यांच्या खुप लहान अपेक्षा …
Read More »Monthly Archives: September 2020
ऐतिहासिक निवाडा
शेकडो साक्षी-पुरावे, हजारो कागदपत्रे, आणि असंख्य तारखा खर्ची पडल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लखनौमध्ये बुधवारी अखेर ऐतिहासिक निवाडा दिला. या निवाड्यानुसार विवादित बाबरी मशीद पाडण्याप्रकरणीच्या सर्वच्या सर्व 32 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. या निकालामुळे भारतातील तमाम हिंदू धर्मियांना आनंदाचे भरते येणे साहजिकच होते. कारण हा दिवस पाहण्यासाठी त्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू; 519 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह …
Read More »इडब्ल्यूएसमधील अध्यादेश संदर्भात मराठा समाजाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागामध्ये (इडब्ल्युएस) मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढत होते म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि. 29) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली. त्या मध्ये 20-25 समन्वयक उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण यांना सर्वानी समजावून …
Read More »कलाक्षेत्र सुरु करा; पनवेलमध्ये कलाकारांचा मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सगळं काही सुरु आहे, मग काही नियम आणि अटी मध्ये कलाक्षेत्र का सुरु होऊ शकत नाही? त्यापार्श्वभुमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्यावतीने बुधवारी (दि. 30)पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या …
Read More »स्मशानभूमीत फुलतोय फुलझाडांचा मळा
पनवेल : वार्ताहर आयुष्यात सुख दुःख काही मिळून शेवट मात्र स्मशानभूमी होत असतो स्मशानभूमी नाव काढताच अनेकांना भीती वाटते. मात्र पनवेलच्या तक्का येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमध्ये दररोज फूलतो फूल झाडांचा मळा या करता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली …
Read More »नवी मुंबईतील ईटीसी शाळा सुरू करा -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार ईटीसी केंद्र हे केंद्र नसून शाळा असल्याचा निर्वाळा 18 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार उघड झाले आहे. दोन वर्षे होऊनही कोणत्याच आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने काही अधिकार्यांचे फावले आहे. विद्यमान आयुक्तांनी याबाबत तातडीने निर्णय घेत शाळेच्या नियमांनुसार येथे दिव्यांगांसाठी शाळा सुरू करावी. दोषी अधिकर्यांची …
Read More »उरण तालुक्यातील ऐतिहासिक शिलालेखांच्या संवर्धनाची गरज
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरातील काही ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अतिपुरातनकालीन पाषाणातील दुर्मिळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदित गधेगळ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेखांच्य संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. कारण येथील शिलालेख अडगळीत पडलेेेले आहेत, तसेच काही जणांनी देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून …
Read More »महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे कापडी पिशव्या वाटण्याचा संकल्प
पनवेल : वार्ताहर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकमुक्त अभियानांतर्गत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजार कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा संकल्प केला आहे. या कापडी पिशवीचे विमोचन भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत …
Read More »नवी मुंबईने ओलांडला 36 हजार रुग्णसंख्येचा टप्पा
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 36 हजार पार झाली असून, आतापर्यंत शहरात एकूण 36 हजार 257 कोरोनाबधित आढळले आहेत. मंगळवारी (दि. 29) शहरात 323 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरात कोरोनामुक्तीचा दर …
Read More »