Breaking News

Monthly Archives: November 2019

दीपक गुरव यांनी शब्द पाळला; उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

पेण : प्रतिनिधी पक्षांतर्गत झालेल्या समझोत्यानुसार पेणचे उपनगराध्यक्ष दीपक गुरव यांनी शनिवारी (दि. 30) आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्याकडे दिला. या वेळी नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, अजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवून  मला उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी …

Read More »

नागोठणे आरोग्य केंद्राच्या कारभारासंदर्भात आमदार रविशेठ पाटील घालणार लक्ष

नागोठणे : प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काही वेळा कुलूप लावले जाते. हा विषय माझ्या कानावर आला असून लवकरच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना येथे आणून त्यांच्या समवेत या ठिकाणी चर्चा करणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने नागोठणे आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच …

Read More »

कर्जतमध्ये उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी

कर्जत : बातमीदार उल्हास नदीवर कर्जत तालुक्यात पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी मागील राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल 20 कोटींची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत, अशी मागणी होत होती. …

Read More »

मुरूडमधील इंटरनेट सेवा बंद

दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार 10 दिवस ठप्प मुरूड : प्रतिनिधी निसर्गरम्य मुरूड शहर व परिसरात आपली हक्काची जागा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जागा खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याद्वारे शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो, मात्र गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात एकाही …

Read More »

कर्जत पालिकेकडून जलकुंभांची स्वच्छता

प्रत्येक टाकीत होता सहा इंच मातीचा थर कर्जत : बातमीदार कर्जत शहराची वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेतील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नव्हते. 20 वर्षांनंतर आता या योजनेतील जलकुंभ स्वच्छ केले जात आहेत. त्यात प्रत्येक जलकुंभामध्ये सुमारे सहा इंच मातीचा थर आढळून आला. दरम्यान, जलकुंभ स्वच्छ केल्याने कर्जत शहराला  …

Read More »

धोनीच्या भवितव्याबद्दल सौरव गांगुली म्हणतो…

कोलकाता : वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केले आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी …

Read More »

महाविकास आघाडी सरकार आणि महाआव्हाने

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेऊन सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच …

Read More »

स्टीव्ह स्मिथचा विक्रम; सर्वांत जलद सात हजार धावा

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. 30 वर्षीय स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी डावांत सात हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने त्याच्या 70व्या कसोटी सामन्यातील 126व्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद मूसाच्या चेंडूवर धाव …

Read More »

नव्या सरकारचे भवितव्य काँग्रेस-राष्ट्रवादीवर अवलंबून

महाराष्ट्राच्या 14व्या  विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आणि त्याची मतमोजणी 24 ऑक्टोबर 2019 रोजी घेण्यात आली. 288 जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. लौकिकार्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित महायुतीला सरकार स्थापनेसाठी जनादेश मिळाला होता, …

Read More »

एका षटकात हॅट्ट्रिकसह पाच बळी

कर्नाटकच्या गोलंदाजाचा अनोखा विक्रम सुरत : वृत्तसंस्था कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिक घेत एका षटकात तब्बल पाच विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत हरियाणाविरुद्ध खेळताना मिथुनने 39 धावा देऊन पाच गडी बाद केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात पाच विकेट्स मिळवले. …

Read More »