Breaking News

Monthly Archives: February 2020

हम भी है जोश में!

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. सलामीला यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेश व न्यूझीलंडला नमवून साखळीतील चौथ्या व अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचे माफक आव्हान सात विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात भारताचे पारडे जड होते आणि संघाने अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. खरंतर याआधीचे सामने तगड्या …

Read More »

स्मरण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारींचे

निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती. 1 मार्च 1922 रोजी जन्मलेले नानासाहेब समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य केले. नानासाहेबांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात 400 …

Read More »

मराठीचा हुंकार आणि पुनश्च स्वातंत्र्यवीर सावरकर!

2020चा फेब्रुवारी महिना हा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मुळात या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले. 29 फेब्रुवारी ही तारीख साधारणपणे चार वर्षांनी येते. हा जन्मदिवस फार कमी लोकांचा आहे. एकेकाळच्या काँग्रेसच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंदिरा गांधी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत टक्कर देणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस. तसं …

Read More »

प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी केले तीन जागतिक विक्रम

प्रयागराज : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रयागराज येथील एका भव्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 26 हजार 791 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त उपकरणांचे वाटप केले. या वेळी पंतप्रधानांनी तीन जागतिक विक्रमदेखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मान …

Read More »

गोठा, मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार  तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »

आगीत घर भस्मसात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे धरणे

अलिबाग : प्रतिनिधी शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात याव्यात, यासह राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक परिषदेतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, सहकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, संघटनमंत्री भगवानराव साळुंखे, …

Read More »

मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूडमधील नागरिकांची ससेहोलपट

मुरुड : प्रतिनिधी जानेवारीतील मासिक रॉकेलपुरवठा न झाल्याने मुरूड तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची ससेहोलपट होत आहे. फेब्रुवारी महिना संपला तरीही जानेवारी महिन्याचा रॉकेल टँकर मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील रॉकेल टँकर कोणी पळवून नेला याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मुरूड तालुक्यात दोन गॅस सिलिंडर असणार्‍यांची संख्या …

Read More »

शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त गोरगरीब-कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्वर्गीय जनार्दन भगत यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने बसविण्यात आली. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण शनिवारी (दि. 29) करण्यात आले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात निबंध स्पर्धा उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धा मंगळवारी (दि. 25) आयोजित केली गेली. संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. …

Read More »