Breaking News

Monthly Archives: October 2021

पनवेलमध्ये वॉकेथॉनला प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्तडॉ. सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या 78व्या जयंतीनिमित्त उमूर सेहत अंजुमन-ए-नजमी यांच्या वतीने रविवारी (दि. 31) पनवेलमध्ये वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. पवित्रतेच्या आनंद आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार दाऊदी बोहरा समुदाय केवळ समुदायाच्या सदस्यांसाठीच नव्हे; तर संपूर्ण मानवजातीसाठी चांगल्या आरोग्यासंदर्भात जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित करीत असते. …

Read More »

विकसक, व्यावसायिकांसाठी दिवाळीनिमित्त सिडकोतर्फे योजना

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिवाळीनिमित्त सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण …

Read More »

वानखेडेंचे नाव गोवण्यासाठी साईलला पैसे देण्यात आले; ड्रग्ज पार्टी प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा खळबळजनक आरोप

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमली पदार्थविरोधी दलाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पाठिंबा व्यक्त करतानाच कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोठा आरोप केला आहे. वानखेडे हे अतिशय कार्यशील अधिकारी असून त्यांनी 25 कोटींची लाच मागितली असे सांगण्यासाठी एनसीबीचे पंच प्रभाकर साईलला पैसे देण्यात आले, असा …

Read More »

कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था; सिडकोचे दुर्लक्ष

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यास सिडको अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अधिकार्‍यांच्या संगनमताने रस्ता खोदून केबल, वायर, पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. सुटीचा दिवस बघून रस्ते खोदकाम करण्याचे संदेशच काही मिठाईच्या बदल्यात सिडको अधिकारी देत असल्याची माहिती मिळत आहे. सिडकोची कोणतीही परवानगी …

Read More »

उद्यापासून रंगणार रायगड प्रीमियर लीग

उरण : प्रतिनिधीआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पावनभूमी असणार्‍या पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील भव्य आद्य क्रांतिवीर मैदानावर रायगड प्रीमिअर लीग (आरपीएल) ही क्रिकेटची भव्य स्पर्धा 2 नोव्हेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 क्रिकेट संघांमध्ये क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. क्रिकेटच्या …

Read More »

कामोठ्यातील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुविधा

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिक कॅथलॅबचा उद्घाटन सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कामोठ्यातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक कॅथलॅब ही लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे …

Read More »

राज्यात मोठा दूध घोटाळा; भाजपच्या विखे-पाटील यांचा आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी मागील भाजप सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते, मात्र शेतकर्‍यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकर्‍यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार …

Read More »

दिवाळीनंतर तीन मंत्री आणि तीन जावयांचे फटाके फोडणार; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर सहा जणांचे फटाके फोडणार आहे. यात तीन मंत्री आणि तीन जावई असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी लवंगी फटाके फोडले. मी मात्र एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही दावा सोमय्यांनी केला आहे. ते …

Read More »

सर्वांना भाजपचे आकर्षण; उलवे नोडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची क्रेझ आजही कायम असून उलवे नोडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 30) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप बिहार प्रकोष्ठ …

Read More »

सामूहिक आत्महत्येने नवी मुंबई हादरली; आईसह मुलगा, मुलीचा मृत्यू

नवी मुंबई : दिवाळीपूर्वी नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीतील एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी अशा तिघांनी सामूहिक आत्महत्या केली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 85 वर्षीय मोहिनी कामवानी, मुलगा दिलीप कामवानी (67) आणि मुलगी कांता कामवानी (61) यांनी तीन दिवसांपूर्वी विष …

Read More »