Saturday , December 3 2022

Ramprahar News Team

खालापूर सेतुला दलालांचा विळखा

नागरिकांची दिशाभूल, खापर अधिकार्‍यांवर खोपोली : प्रतिनिधी खालापूर तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्राबाहेर दलालांचा उपद्रव वाढला असून, त्यांचा त्रास विद्यार्थी, नागरिकांबरोबर अधिकार्‍यांनादेखील होत आहे. सध्या शैक्षणिक प्रवेश, पोलीस भरती प्रक्रिया आणि निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने खालापूरला येताहेत. दाखले प्रक्रियेबद्दल अनेक जणांना असलेला अज्ञानाचा …

Read More »

रायगडात थेट सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल

गोरठण ग्रामस्थांनी रचला इतिहास; ग्रामपंचायत बिनविरोध खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच थेट निवड असल्याने हौशेनवशांनादेखील सरपंचपदाची स्वप्न पडत आहे. खुर्चीसाठी साठमारी सुरू असताना तालुक्यातील गोरठण ग्रामस्थांनी थेट सरपंचासह नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करित एक आदर्श घालून दिला आहे. – बिनविरोध निवड झालेले उमेदवार किशोर …

Read More »

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा पुरविता येतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विविध ऑनलाइन सुविधा सुरू केल्या असून, त्यासोबतच नागरिकांना एखादी योजना राबविताना किंवा एखादी समस्या दिसल्यास ती मांडण्यासाठी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याची सोयही उपलब्ध करून …

Read More »

महाडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल

अलिबाग : जिमाका कोएसोच्या महाड येथील वि. ह. परांजपे विद्यामंदिर येथे बुधवारी (दि. 30) सकाळी नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत मॉकड्रिल करण्यात आले.राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग …

Read More »

खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा; नगरपालिकेचा उदासीन कारभार

खोपोली : प्रतिनिधी एकीकडे स्वच्छता अभियान अंतर्गत दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणसाठी खोपोली नगरपालिकेचा करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. खोपोलीतील अनेक प्रभागात सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून करण्यात …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय कॅडेट कोर विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र आणि दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय कॅडेट कोर विभागाचे प्रमुख एएनओ कॅप्टन …

Read More »

उरणमध्ये गोवरचा संशयित रुग्ण

आरोग्य विभाग सतर्क; जनजागृतीसह लसीकरणावर भर उरण ः रामप्रहर वृत्त कोरोनानंतर आता गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकांसमोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये …

Read More »

खारघर आणि कामोठे खाडीत वाळूमाफियांविरुद्ध कारवाई

पनवेल ः वार्ताहर खारघर आणि कामोठे खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्‍या वाळू माफियांवर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशनाखाली व अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांचे नेतृत्वाखाली पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पोलिसांनी धडक कारवाई करीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आठ छोटे आणि मोठ्या बार्ज आणि दोन संक्शन पंप …

Read More »

सीवूड आश्रमशाळेवर पालिका, सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) धडक कारवाई करण्यात आली. या वेळी आश्रमातील काही जणांचे विस्थापन होणे बाकी होते, मात्र पोलिसांनी त्यांना बुधवारी हलवल्यानंतर ही निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई भाजप महिला …

Read More »

कर्णकर्कश आवाजापासून होणार मुक्तता

47 सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोडरोलर पनवेल ः वार्ताहर कर्णकर्कश आवाज करणार्‍या 47 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून नष्ट करण्याची कारवाई पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी (दि. 2) वाहतूक शाखेने केली आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये कर्णकर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर दुचाकींना लावून वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड वाढले आहे. यामुळे मात्र परिसरातील …

Read More »