Breaking News

Monthly Archives: January 2021

सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासून लोकल

मुंबई : प्रतिनिधी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोमवार (दि. 1)पासून अखेर पुन्हा एकदा लोकल धावणार आहे. अर्थात त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवश्यक सेवा देणार्‍यांसाठी लोकलची दारे उघडी झाली. आता सामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली …

Read More »

आशयपूर्ण एकांकिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने! तुफान प्रतिसादाने स्पर्धा हाऊसफुल्ल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या तिसर्‍या व अंतिम दिवशीही रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद …

Read More »

जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील आझाद चौकात रविवारी (दि. 31) जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रथेप्रमाणे ध्वजारोहण झाले. मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यांवर नवाबाची राजवट होती. मुरूड येथील राजवाड्यातून ते कारभार चालवत. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरीही जंजिरा संस्थान नवाबाच्या ताब्यात …

Read More »

‘त्या’ आरोपींना सशर्त जामीन

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पिस्तूल दाखवून वाहतुकीतून मार्ग काढणार्‍या आरोपींना रविवारी (दि. 31) खोपोली पोलिसांनी खालापूर न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने या आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मध्यरात्री कारचालक आणि त्यातून प्रवास करणारे लोक पिस्तूल दाखवत ट्रॅफिकमधून रस्ता काढत पुढे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल …

Read More »

कृषी कायद्यांबाबत पवारही भूमिका बदलतील : तोमर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकर्‍यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषिमंत्री असताना कायद्यात सूचविलेले बदल यांची पवारांनी तुलनात्मक समीक्षा केली …

Read More »

सामान्यांसाठी लोकलसेवा अपूर्णच

मुंबईसह उपनगरे आणि आसपासच्या भागांतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल आजपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी या रेल्वे प्रवासास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे, मात्र त्यामुळे दैनंदिन नोकरी करणार्‍या सामान्य नागरिकांच्या प्रवासाची उद्दिष्टपूर्ती न होण्यासारखीच आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा परवानगी …

Read More »

तिरंग्याच्या अपमानाने देश दु:खी; दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची नाराजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीत उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 31) आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केले. दिल्लीत 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगी ध्वजाचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असे …

Read More »

आज सादर होणार डिजिटल केंद्रीय अर्थसंकल्प; देशवासीयांचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22च्या बजेटकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याचबरोबर रेल्वे बजेटही सभागृहात मांडले जाईल. यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थमंत्री ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन जात. यंदा पेपरलेस बजेट सादर केले जाणार …

Read More »

‘दिशा’तर्फे हळदी-कुंकू समारंभात मार्गदर्शनाचा वाण

पनवेल : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंचच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. ’ती’च्या नजरेतून हा उपक्रम या वेळी राबविण्यात आला. कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे झालेल्या या समारंभात उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकवाची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान …

Read More »

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिडकोचेउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना शनिवारी (दि. 30) दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल …

Read More »