Breaking News

Monthly Archives: July 2022

नव्या सरकारचा धडाका

राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवे सरकार स्थापन झाल्याला महिना पूर्ण झाला आहे. आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू आहेत. विरोधकांनी मात्र हा मुद्दा पुढे करीत ओरड चालविली आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या …

Read More »

पनवेल पनपा क्षेत्रात विकसित होणार केणीपट्टा

पनवेल ः प्रतिनिधी पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाली गावातील केणी कुटुंबीय केणीपट्टा (नगर) विकसित करतील, असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मगरपट्टा सिटीला भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही …

Read More »

कर्जत आगरी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी गुणवंतांचे कौतुक करून करिअरविषयी मार्गदर्शन केले. नेरळ-कोल्हारे …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय कुंग-फू स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्पर्धकांना प्रोत्साहित पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 31) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत …

Read More »

पनवेलमध्ये घराला आग

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी …

Read More »

खारघरमध्ये मिनीबस पुलावरून कोसळली; चालक जखमी

पनवेल : वार्ताहर खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. खेड येथून मिनी बस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला असताना खारघर स्टेशनच्या  उड्डाण पुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका कंटेनर ने त्याच्या बसला धडक …

Read More »

आजपासून मासेमारीला सुरुवात; मच्छीमारांची लगबग

उरण : रामप्रहर वृत्त पावसाळी हंगामात मासेमारीवर शासनाने घातलेली दोन महिन्यांची बंदी सोमवार (दि. 1 ऑगस्ट)पासून उठत असल्याने मच्छीमारांची मासेमारीसाठीची लगबग सुरू आहे. उरणच्या करंजा व मोरासह इतर बंदरातील खलाशी आणि मच्छीमार यासाठी तयारीला लागले आहेत. बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छीमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन …

Read More »

रायगडातील माळराने रानफुलांनी बहरली

माणगाव ः प्रतिनिधी पावसाळ्याच्या दिवसात रानफुलांना बहर आला असून माळरानावर गवत फुलांचा सडा पसरला आहे. संततधार पडणारा पाऊस, पावसाळ्यातील आल्हाददायक गारवा यामुळे रायगड जिल्ह्यातील माळराने विविध फुलांनी बहरली आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविधतेने रायगड जिल्ह्यातील जंगल समृद्ध आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यातील माळरानावर, डोंगरावर विविध प्रकारच्या फुले, वनस्पती उगवतात. साधारणतः …

Read More »

पेणमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन

पेण ः रामप्रहर वृत्त पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मूर्तीकार समुदायासह जेएसडब्ल्यू ग्रुपने सहयोग केला आहे. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित जेएसडब्ल्यू इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे 5 ते 7 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल या मूर्तिकारांमध्ये जेएसडब्ल्यूचे जाणीवजागृती निर्माण करण्याचे …

Read More »

फेसबुक पोस्टप्रकरणी तरुणीवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील आशा अनंत राणे या तरुणीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याबाबत आंबेडकर अनुयायांनी नेरळ पोलीस ठाणे येथे शेकडोंच्या संख्येने जमून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, त्या तरुणीविरूद्ध समाजात भावना भडकावून वातावरण दूषित करणे आणि …

Read More »