Breaking News

Monthly Archives: December 2021

भाताणकरांना नववर्षाची भेट; जलजीवन मिशन अंतर्गत आज पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. भाताण गावात होणार्‍या या योजनेचे भूमिपूजन …

Read More »

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; आता बांधणी कोकणातील आगामी निवडणुकांसाठी -राणे

कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीनंतर निकाल समोर आले. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी …

Read More »

नववर्षाचा उत्साह, मात्र झपाट्याने वाढणार्‍या कोरोनामुळे चिंता

पनवेल : राज्यात सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनानेही डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बंध असले तरी नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत घरात राहून करणेच पसंत केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढून तो आकडा आठ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे …

Read More »

‘भाजयुमो’तर्फे विद्यापीठ कायद्याची होळी

पुणे : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने राज्यव्यापी काळे विधेयक होळी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालिका चालवली जाणार आहे. यावेळी …

Read More »

उलवे नोडमध्ये आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळण्यास सुरुवात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मेडरीका क्लिनिकचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या सुख सुविधा मुंबईमध्ये मिळणार नाही त्या सुविधा विषेश करून आरोग्याच्या बाबतीतील सुविधा उलवे नोडमध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 31) उलवे नोड येथे केले. ते उलवे नोड येथील …

Read More »

भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता; श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

दुबई : वृत्तसंस्था भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे. दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने डीएलएस पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा …

Read More »

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या महिलांची विजयी पताका

जबलपूर : वृत्तसंस्था बहुप्रतिक्षित वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद  स्पर्धेतील दोन्ही गटांची अंतिम फेरी अपेक्षेप्रमाणे कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये रंगली, परंतु यंदा महाराष्ट्राच्या महिलांनी 2019मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला धूळ चारून जबलपूरमध्ये विजयी जल्लोष केला, मात्र रेल्वेविरुद्ध पुरुषांचे सलग दुसर्‍यांदा विजेतेपद हुकले आहे.  महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम …

Read More »

नवी मुंबईसाठी मार्गिका बांधा; अन्यथा ऐरोली-काटई पुलाचे काम बंद पडू!

आमदार गणेश नाईक आक्रमक नवी मुंबई : बातमीदार ऐरोली-काटई उन्नत पुलाचा नवी मुंबईकरांसाठी उपयोग झालाच पाहिजे. या पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचा प्रश्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या 15 जानेवारीपर्यंत मार्गी लावला नाही, तर या पुलाचे काम बंद पाडू आणि पालिका मुख्यालयातही आंदोलन करू, असा इशारा आमदार …

Read More »

रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील सर्व रिक्षा चालकांनी गणवेश परिधान केल्याचे पाहायला मिळालेे. तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन होत असल्याचे गुरुवारी (दि. 30)पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी रिक्षा थांब्यावर अचानक दिलेल्या भेटीत पहावयास मिळाले. मागील काही दिवसांपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या रिक्षा चालकांवर नवी मुंबई वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम …

Read More »

बँकांनी स्वयंसहाय्यता समूहांना पाठबळ द्यावे -डॉ. हेमंत वसेकर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य कक्षाने नवी मुंबई कार्यालयात राज्यातील सर्व सार्वजनिक, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांची …

Read More »