नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे खातेवाटप नुकतेच जाहीर झाले. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खाते नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आले, तर देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून …
Read More »Monthly Archives: May 2019
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ’चला रंगवूया पनवेल’
पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपच्या वतीने ’चला रंगवूया पनवेल’ शिर्षकाखाली दि. 4 ते 14 जूनपर्यंत ‘सुंदर माझी भिंत’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार, तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयांचे आहे. स्पर्धेत सर्व …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महास्वच्छता अभियान
पनवेल ः प्रतिनिधी सर्व समाजाचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता लोकनेते …
Read More »पनवेल पालिकेचा एक हजार 35 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 1035 कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 31) झालेल्या विशेष सर्वसाधारण महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महापालिकेला विकासासाठी खर्च करताना असलेली तांत्रिक अडचण दूर झाली आहे. पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात …
Read More »झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार ; पालिका आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पनवेल ः प्रतिनिधी इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीवर बुधवारी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून तेथील अनधिकृत व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी त्या ठिकाणी राहणार्या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या, त्यांना महापालिका 15 दिवसांत नवीन झोपड्या बांधून देईल, असे आश्वासन शुक्रवारी (दि. 31) महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका सभागृह नेते परेश …
Read More »रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल आणि परिसर स्वच्छ करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटशेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडापासून सकाळी 8 वाजता होत आहे. मला शुभेच्छा देऊ इच्छिणारे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी पुष्पगुच्छ वा फुले न आणता थेट या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन …
Read More »पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे!
संपूर्ण जगात पर्यटन हा विषय आवडीचा बनला आहे. शाळेच्या सुट्ट्या अथवा शनिवार, रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी जाऊन तेथील निसर्गाचा आनंद लुटणे हा भारतासह इतर देशात सुद्धा आवडता उपक्रम बनला आहे.परदेशात पर्यटकांना सुरक्षा पोहोचवणारे कडक कायदे अंमलबजावणीसुद्धा होत असते. त्यासाठी त्याचे काटेकोर नियम व त्याचे …
Read More »दमदार सुरूवात
शपथविधीनंतर दुसर्या दिवशी खातेवाटप जाहीर करीत, देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांची तसेच अर्थमंत्री पदी निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करून मोदी यांनी दुसर्या सत्तापर्वातील आपल्या मंत्रिमंडळाला नवा चेहरामोहरा बहाल केला आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात देशोदेशींच्या नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या साक्षीने स्वत: मोदी व त्यांच्या 57 मंत्र्यांनी पद …
Read More »डॉ. प्रभाकर गांधी कालवश
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील गरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रभाकर गांधी यांची प्राणज्योत गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मालवली. डॉ. प्रभाकर गांधी संपूर्ण तालुक्यात गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात. राजकारणात असूनदेखील गरिबांसाठी कोणताही पक्ष, वा जात-पात-धर्म न बघता वयाच्या अखेरपर्यंत त्यांनी सेवा केली. ते समाजवादी विचारश्रेणीत वाढले होते. …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे झोपडीधारकांना निवारा
पनवेल : नितीन देशमुख पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून त्यांचे बांधकाम पाडल्यावर त्याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठी रस्त्याच्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येणार आहे. त्याठिकाणी राहणार्या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या त्यांची राहण्याची …
Read More »