Breaking News

Monthly Archives: June 2020

नॉन कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करा; नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी

पनवेल ः बातमीदार पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली …

Read More »

आता शुभमंगल ‘सावधान’!; नियमांचे पालन न केल्यास होणार गुन्हा दाखल

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा व महत्त्वाचा क्षण… या वेळी सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावावी, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असते, पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी शासनाने …

Read More »

सर्वेक्षणकामी गैरहजर कर्मचार्‍यांना आयुक्तांचा दणका; 500 रुपयांचा दंड

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी 500 रुपये दंड …

Read More »

कोरोनाबाधितांच्या समस्यांकडे नगरसेविका दर्शना भोईर यांनी वेधले आयुक्तांचे लक्ष

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा होत असल्याच्या गंभीर बाबीकडे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. महानगरपालिके अंतर्गत उपचार घेत असलेल्या विविध ठिकाणी रुग्णांना सेवा देताना मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत आहे. इंडिया बुल्स या ठिकाणी ठेवलेल्या …

Read More »

राजकीय पार्श्वभूमी पाहून मदत वाटप; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राजकीय पार्श्वभूमी पाहून मदतीचे वाटप केले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या घराला, ज्याच्या घरांचे दोन पत्रे उडालेत अशा लोकांना दीड लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, परंतु ज्यांचे खरंच नुकसान झाले आहे त्यांना मात्र अद्याप मदत मिळाली नाही. नुकसानीचे पंचानामेदेखील राजकीय हेतूने प्रेरित होऊनच केले …

Read More »

समर्थ दिशादिग्दर्शन

देशात बुधवारपासून अनलॉक 2 ला सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अतिशय संयतपणे येणार्‍या परिस्थितीविषयी दिशादिग्दर्शन तर केलेच, खेरीज आवश्यक तेथे वास्तवाची जाणीव करुन देत सामाजिक तसेच वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या हेळसांडीबद्दल टोकले देखील. नोव्हेंबरअखेरपर्यंत 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य देण्याची त्यांची घोषणा …

Read More »

सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीने मोफत वाचनालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल संस्थेच्या वतीने मोफत वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संघाच्या कार्यालयात संपन्न झाला. संघाचे माजी अध्यक्ष बळीराम उर्फ भाऊ परब यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यमान अध्यक्ष केशव राणे, सहसचिव दीपक तावडे, सहखजिनदार बाबाजी नेरुरकर, संपर्कप्रमुख गुरुदास वाघाटे, सुरेंद्र नेमळेकर, …

Read More »

शिवसेनेचे रवींद्र कोळी, महेंद्र कोळी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

उरण ः प्रतिनिधी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत चाणजे शिवसेनेचे विद्यमान सदस्य रवींद्र कोळी व करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन महेंद्र कोळी यांनी मंगळवारी (दि. 30) भाजप कार्यालय उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ …

Read More »

कासाडी नदी प्रदूषणाची अधिकार्‍यांकडून पाहणी

कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीत सोमवारी (दि. 29) पहाटे विघातक विषारी पाणी सोडल्याने कानपोली पुलाखाली पाण्याला लाल रंग आला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दुसर्‍याच दिवशी पाहणी केली, मात्र संबंधित रसायन हे कानपोली पुलाच्या खाली असल्याने ते क्षेत्र …

Read More »

आधार फाऊंडेशनचे गोरगरिबांसाठी अन्नछत्र; 40 हजार नागरिकांना अन्नदान

कळंबोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे  रोजंदारी, नाका कामगारांची रोजीरोटी बंद झाली. निराधार महिलांची कामे गेली. व्यवसाय ठप्प झाले तसेच अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. हातावर पोट असलेल्यांना पोट कसे भरायचे याची चिंता लागली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या परिस्थितीत गरीब-गरजू उपाशी राहू नयेत म्हणून …

Read More »