Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर …

Read More »

खालापुरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी भाजपमध्ये

मुंबई : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघामधील आणि खालापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले.मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, …

Read More »

उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीदरम्यान भव्य नमो चषक 2025

खेळाडू, क्रीडारसिक घेणार लाभ -लोकनेते रामशेठ ठाकूर उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23, 24 व 25 जानेवारीला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील …

Read More »

युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदारदेशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणार्‍या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा असलेल्या संस्कृतमधून आमदारपदाची शपथ घेतली. विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून शनिवारी (दि. 7) पहिल्या दिवशी विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. …

Read More »

नवकेतन फिल्म @ 75 : चित्रपट इतिहासातील मानाचे स्थान

मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी मराठी चित्रपटांचे विशेष खेळ महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित करण्यात येतात त्या प्रत्येक वेळी 147 क्रमांकाचे कार्यालय मला कायमच खुणावत असते. जुन्या आठवणीत नेत असते. याचं कारण तेथे नवकेतन फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचे स्थापनेपासूनच कार्यालय होते. कालांतराने सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपट प्रसिद्धीतील आघाडीचे पीआरओ …

Read More »

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर …

Read More »

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10) बैठक झाली. या वेळी मंत्रीमहोदयांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे सहभागी होत युजीसी नियमानुसार प्रत्येक कामगाराला किती पगार देणार याची माहिती 15 दिवसांच्या …

Read More »

कर्मवीरांचे कार्य जातीपातीविरहित -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांचा दृष्टिकोन विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातिपातीविरहित शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळेच …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्री

नवी मुंबई ः बातमीदार सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर माझी सही झाली असून काही दिवसांत अध्यादेश जारी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 22) केली. ते ऐरोली येथे साकारण्यात येत असलेल्या कोळी भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान …

Read More »