Breaking News

Monthly Archives: June 2021

माथेरानमधील डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवेत, कोरोना काळात ठरले देवदूत

कर्जत : बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार …

Read More »

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी साकारल्या 412 परसबागा

अलिबाग : प्रतिनिधी महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणार्‍या  ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद‘ च्या माध्यमातून 15 जून  ते 15 जुलै या कालावधीमध्ये माझी पोषण परसबाग विकसन मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात उमेद अभियानातून सामूहिक व वैयक्तिक स्वरुपात 412 परसबागांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये स्वयं सहाय्यता समूह तसेच ग्रामसंघांच्या पदाधिकार्‍यांनी …

Read More »

खालापुरात रानडुकरांचा उच्छाद; शेतकर्‍यांच्या भातशेतीची नासधूस

खालापूर ः प्रतिनिधी आधीच विविध समस्यांमुळे बळीराजा त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील माणकिवली परिसरात शेतकरीवर्गापुढे नवे संकट उभे राहिले आहे. येथील भातरोपांची रानडुकरांनी नासधूस केल्याने शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असताना येथील बहुतांशी शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती …

Read More »

पावसाळ्यातही खालापूरकर कोरडे; पाणीपुरवठा योजना तीन दिवसापासून बंद

खोपोली : प्रतिनिधी वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने खालापूर शहरातील कुटुंबांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून विहिरीचा आश्रय घेतला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतील वीज पंप जळणे, कधी …

Read More »

माणगाव पुलाजवळील कचरा उचलला; दै. रामप्रहरच्या वृत्ताची नगरपंचायतीकडून दखल

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील काळ नदी पुलाजवळ केरकचरा टाकण्यात येत होता. तो पावसात कुजून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने रिक्षा चालक, प्रवासी, नागरिक हैराण झाले होते. त्याबाबत बुधवारी (दि. 30) दै. रामप्रहर वृत्त प्रसिद्ध होताच  माणगाव नगरपंचायतीला जाग आली. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नगरपंचायतीचे सफाई कामगार पाठवून सदरचा कचरा त्वरीत …

Read More »

स्थानिकांना न्याय द्या; अन्यथा उपोषण; विळे भागाड ग्रामस्थांचा इशारा; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीमधील पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी बाहेरील पुढार्‍यांनी स्थानिकांच्या विरोधात गुंडगिरी चालू केली आहे, ती त्वरित थांबवून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी विळे भागाड ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यांतील विळे भागाड येथील जमीन कवडीमोल भावात संपादित करुन तेथे …

Read More »

कोरोनामुळे निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ‘टीआयपीएल’कडून आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा. लि. अर्थात टीआयपीएल कंपनीच्या वतीने कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला. याद्वारे टीआयपीएल कंपनीने एक आदर्श पायंडा पाडला आहे.टीआयपीएलमध्ये सुपरवायझर या पदावर काम करणारे विशाल तुकाराम घरत, संजय धर्माजी म्हात्रे …

Read More »

आजपासून पालख्यांचे प्रस्थान

आषाढी यात्रेवर यंदाही कोरोना निर्बंध मुंबई ः प्रतिनिधीपंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी गुरुवार (दि. 1)पासून पालखी प्रस्थान होणार आहे. यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. …

Read More »

आता मुस्लिम आरक्षणासाठी लढाई

वंचित बहुजन आघाडीचा 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी येत्या 5 जुलैला विधान भवनावर भव्य मोर्चा काढणार आहेत. वंचित …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधीसंभाजी ब्रिगेड संघटनेने बुधवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती, पण भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.मराठा समाज …

Read More »