Breaking News

संपादकीय

आईला स्थान स्वागतार्हच

सरकारी दस्तावेजांमध्ये आईचे नाव निव्वळ वेगळ्या रकान्यामध्ये न नोंदवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशी नाव लिहिण्याची नवी पद्धत बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आईच्या नावाला स्वत:च्या संपूर्ण नावात स्थान देण्याबाबत व हे नाव वडिलांच्याही नावाआधी घेतले जाण्याबाबत विशेषत: तरुण पिढीची अनुकूलता …

Read More »

बेदरकारीला चाप हवाच

वाघ हा जंगलामधील अन्नसाखळीच्या केंद्रस्थानी असतो. वाघ टिकला तर जंगलातील अवघ्या वन्यजीवविविधतेचा समतोल टिकून राहतो हे आता जगभरात एक प्रस्थापित पर्यावरणीय तत्त्व मानले जाते. त्यामुळे जिथे जिथे वाघ आहे, अशा सर्व अभयारण्यांमध्ये वाघांना जपण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जाते. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प असलेले जिम …

Read More »

सायबर हल्ल्याची चुणुक!

फेसबुक-इन्स्टाग्राम बंद पडले तेव्हा भारतात रात्रीची वेळ होती तर अमेरिकेत दिवसाला सुरूवात होत होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा दिवस, ‘सुपर ट्यूस’डे असताना सकाळीच फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्याने हा मोठा सायबर हल्ला आहे की काय याची भीती तिकडे व्यक्त होऊ लागली. एकंदर दोनएक तासासाठी जगभरातील लाखो लोक भयग्रस्त झाले …

Read More »

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले दिसून आले. यंदा पहिल्यांदा महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव ठेवला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होणार असल्याने राज्याचा अर्थसंकल्प न मांडता या वेळी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडले गेले, मात्र मोदी …

Read More »

आंदोलन चिघळणार?

राजधानी नवी दिल्लीनजीक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पंजाब-हरियाणातील शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी चिघळेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक शेतकर्‍यांनी मोर्चाला सुरुवात करताच केंद्र सरकारने आपल्या मंत्र्यांना आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडूनही अद्याप तोडगा हाती लागलेला नाही. दरम्यान, शेतकरी हा आपला …

Read More »

दुबळी विरोधी आघाडी

एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चिरफळ्या उडत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज अधिक प्रभावीपणे प्रचाराला दिशा देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसकरिता जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या न्याय यात्रेला त्यांच्या यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे लपून …

Read More »

रोख्यांचा रोख कोणाकडे?

निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांना ज्या काही आर्थिक कसरती कराव्या लागतात, त्यातूनच काळ्या पैशाचा महापूर येतो. हे पाहूनच निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली गेली होती. निवडणूक रोखे हा एक सर्वमान्य असा सुवर्णमध्य होता. त्यामध्ये पुरेशी पारदर्शकता नाही असे सहज म्हणता येते, परंतु त्यामुळेच निवडणूक काळातील वेड्यावाकड्या व्यवहारांना काही प्रमाणात तरी आळा बसू …

Read More »

‘सीएए’ आणि गैरसमज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी करून कायदा लागू करण्यात येईल, असे शाहांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा कायदा म्हणजे अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, मात्र …

Read More »

मनमोहन… भूमिका छोट्याच, प्रभाव मोठा!

तुम्हाला शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित आराधना (1969) सुपरहिट गाण्यांसह अनेक गोष्टींसाठी सहज आठवत असेलच, त्यात एका प्रसंगात श्याम (मनमोहन) अतिशय दुष्ट हेतूने, विखारी नजरेने, पापी लालसेने वंदनाच्या (शर्मिला टागोर) घरी येतो आणि जालीमपणे म्हणतो, जो लडकी मुझे थप्पड मारती है, मै उसे बुरा नही मानता, उसका नाम डायरी मे …

Read More »

अखेरचे अधिवेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामध्ये भारताच्या नारीशक्तीबाबतचा अभिमान स्पष्टपणे दिसून आला. शेवटच्या अधिवेशनात तरी विरोधी खासदारांनी गैरवर्तन थांबवून संसदेच्या कामकाजात विधायक सहभाग घ्यावा अशा शब्दांत त्यांनी खासदारांचे कानही टोचले. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विरोधकांना संसदेमध्ये सूरच सापडला …

Read More »