Breaking News

Monthly Archives: January 2024

अखेरचे अधिवेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामध्ये भारताच्या नारीशक्तीबाबतचा अभिमान स्पष्टपणे दिसून आला. शेवटच्या अधिवेशनात तरी विरोधी खासदारांनी गैरवर्तन थांबवून संसदेच्या कामकाजात विधायक सहभाग घ्यावा अशा शब्दांत त्यांनी खासदारांचे कानही टोचले. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विरोधकांना संसदेमध्ये सूरच सापडला …

Read More »

पोलादपूरमध्ये सहलीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा

पोलादपूर : प्रतिनिधी सहलीसाठी आलेल्या 28 शाळकरी विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुक्यात अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर बुधवारी (दि.31) दुपारी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून सोडून दिल्यावर सहल पुढे मार्गस्थ झाली. नाशिकमधील भोंसला मिलिटरी स्कूलची तीन दिवसीय सहल रायगड जिल्ह्यात आली होती. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थिती

विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 51वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कळंबोली येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप आणि आणि पारितोषिक वितरण भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत …

Read More »

स्व. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 27 जानेवारी ते 3 फेबु्रवारीदरम्यान स्व. श्री. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

पनवेल परिसरात अपघात वाढले

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील खारघर आणि आजिवली या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत खोदकामामध्ये केबल टाकण्याचे काम करणार्‍या एका मजुराचा क्रेनच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. खारघर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन …

Read More »

भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

पनवेल : वार्ताहर भाजपचे पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चिखले येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान केले. युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतो. यंदाही त्यांचे वाढदिवसानिमित्त युवा चषकाचे आयोजन, व्होकल फॉर लोकल माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांचा सन्मान हे …

Read More »

बोरखार रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर विंधणे हरिश्चंद्र पिंपळे बोरखार या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, उरण आणि पनवेल तालुक्यात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार उरण विधानसभा मतदार …

Read More »

बहुजनांचा भरवसा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि अन्य सर्व समाजांचाही विचार केला जाईल याची खात्री बाळगावी, असा शब्द मुख्यमंत्र्यांनीही दिला आहे. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या …

Read More »

गव्हाण विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

विद्यार्थ्यांनी अत्युच्च स्थानाचे ध्येय ठेवावे -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि.29) उत्साहात झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे …

Read More »

अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी जिंकला नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकाविला. देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »