Sunday , September 24 2023

महत्वाच्या बातम्या

दिघाटी-चिरनेर जंगल परिसरात बिबट्याचा वावर

ग्रामस्थांंमध्ये घबराट उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि जवळच असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात बिबट्या फिरत आहे. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी याची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी भयभीत लोक करीत आहेत. पनवेल आणि उरण …

Read More »

नव्या पिढीने कर्मवीरांचा वारसा जपावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपावा, असे आवाहन रयत …

Read More »

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया, डेंग्यू रोगाविषयी सर्वसामान्यांना माहिती देऊन या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पालिकेबरोबर खासगी प्रॅक्टिशनर, लॅब, सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात किटकजन्य आजाराच्या …

Read More »

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शतकोत्तर दशकपूर्ती पूर्ण करून 111व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या माध्यमातून महाडमधील सावरकर अनुयायांनी या गणेशोत्सवाची 110 वर्षांपूर्वी स्थापना केली. शतकपूर्ती करणारे …

Read More »

इतिहास घडला!

‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा निव्वळ निवडणुकीच्या प्रचारापुरतीच नाही, तर ते एक सत्य आहे याचे प्रत्यंतर बुधवारी सार्‍या जगाला आले असेल. कुठल्याही सरकारला आजवर जमले नव्हते ते मोदी सरकारने ‘करून दाखवले’! महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक बुधवारी लोकसभेत दोन तृतीयांशपेक्षा अधिक मतांनी मंजूर झाले. …

Read More »

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आगमन झाले. सकाळपासून घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होती. दीड दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपती बाप्पांना बुधवारी (दि. 20) सायंकाळी निरोप देण्यात आला. जिल्ह्यात …

Read More »

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष खारघरच्या माध्यमातून ट्रॅफिक सिग्नल लोकार्पण सोहळ्याचे आयोजन सेक्टर 15 येथील घरकुल स्पेगिटी चौक येथे रविवारी (दि. 17) करण्यात आले. भाजपचे मावळ लोकसभा मतदरसंघ प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »

उसर्ली येथे लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळा

नागरिकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उसर्लीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध राहू, असे आश्वासन पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळ्यावेळी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त …

Read More »

कर्जतमधील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी!

कर्जत शहरात वाहतूक कोंडी होण्याचे कारण म्हणजे कुठेही उभ्या करण्यात येणार्‍या रिक्षा आणि बाजारपेठेतील दुतर्फा असलेले हातगाडीवाले आणि फेरीवाले. या सर्वांमुळे कर्जतच्या बाजारपेठेतच नव्हे तर शहरातून चालणे कठीण होत आहे. त्यांच्यावर कुणाचाच वचक नाही असा सूर कर्जतकरांकडून ऐकायला मिळतो, परंतु अनेकजण याबाबतीत पाठपुरावा करतात, मात्र त्याला यश येत नाही. दिवसेंदिवस …

Read More »

मराठवाड्याला बूस्टर

सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला राज्यातील महायुती सरकारने विकासाचे भरभरून दान दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. या वेळी मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प जाहीर करण्यात आला. याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे 59 …

Read More »