Breaking News

Monthly Archives: April 2023

पनवेलमध्ये इन्कोव्हॅक लसीकरण सुरू

नाकावाटे घेतली जाणारी लस आरोग्य केंद्रांवर उपलब्ध पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध  करून देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक लसीकरण शनिवार (दि.29) पासून पनवेल महापालिकेच्या  सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे. 60 वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील कृती समितीची बैठक

नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शनिवारी (दि. 29) झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. …

Read More »

मन की बातमुळे जनआंदोलन उभे राहिले : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा रविवारी (दि. 30) 100वा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला, तसेच भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना …

Read More »

खारघरमधील कोपरा गावातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

पनवेल : वार्ताहर खारघरमधील कोपरा गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली. दोघेही मागील 19 ते 20 वर्षांपासून खारघर भागात राहत असल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघा बांग्लादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मूळचा बांगलादेशी असलेल्या मोहम्मद …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून गव्हाण येथे स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 2 मेदरम्यान गव्हाण येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील …

Read More »

कर्जतमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 51 विकासकामांचे भूमिपूजन

एकाच दिवसाचा तालुक्यातील विक्रम कर्जत :प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील नेरळ, शेलू, उमरोली, किरवली, हलिवली ग्रामपंचायत हद्दीत 51 विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले. एकाच दिवशी 51 विकासकामांचे भूमिपूजन हा तालुक्यातील विक्रमच म्हणावा लागेल. भाजप युवा नेते किरण ठाकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांसाठी निधी …

Read More »

कारवाईचा फास आवळू लागल्याने कर्नाळा बँक संचालकांचे धाबे दणाणले!

सीईओ अपर्णा वडके यांना न्यायालयीन कोठडी पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सीईओ अपर्णा वडके यांना शनिवारी (दि. 29) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या घोटाळाप्रकरणी कारवाईचा फास आवळू लागल्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले असून घोटाळ्याचे सूत्रधार शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचे …

Read More »

रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 व 2 जूनला होणार साजरा

मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनामार्फत 1 व 2 जून रोजी किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी …

Read More »

पनवेलमधील ऑक्सिपार्कचे लोकनेते रामशेठ ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिपार्कचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका माजी सभागृह नेते व कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, …

Read More »

दै. रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कर्जत : प्रतिनिधी कर्जत प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना गुरुवारी (दि. 27) माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 11,111 रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर रायगड जिल्हास्तरीय …

Read More »