Friday , September 30 2022

Monthly Archives: September 2022

पनवेलचे जागृत देवस्थान जाखमाता

पनवेल ः संजय कदम नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासियांची आहे. या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. पुजारी व जाखमाता मंदिराचे व्यवस्थापक देवीची पुजाअर्चा व देविच्या मंदीराची सर्व पाहतात. …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्स समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च पेपर पब्लिकेशन यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी आयटीएम एसआयए बिझनेस स्कूलच्या डॉ. संगीता त्रोट या प्रमुख …

Read More »

उरणच्या अमेया यार्डमध्ये आग

तीन कोटींचा कलमार जळाला उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणार्‍या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत तीन कोटी रुपये किमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जेएनपीए बंदरातून देश परदेशात …

Read More »

सोनसाखळी चोरांपासून सावध राहा

पनवेल शहर पोलिसांकडून जनजागृती फलक पनवेल : वार्ताहर सणासुदीचे दिवस…खरेदीची लगबग…अन् महिलांची दागिणे घालून बाहेर पडण्याची हौस…सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे…म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध राहा…गळ्यातील दागिणे, हातातील बॅग, मोबाइल सांभाळा व होणार्‍या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे स्वसंरक्षण करून चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले …

Read More »

पनवेल शहर भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार …

Read More »

रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कामोठे ः रामप्रहर वृत्त शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंत्तीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंत्तीचा कार्यक्रम मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी …

Read More »

नवरात्रीचा प्रसाद

अस्तित्वाची लढाई लढणार्‍या उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाचा झणझणीत डोस पाजला. शिवसेना नेमकी कोणाची, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार असे काही प्रश्न उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारात नेले. वास्तविक यातील बरेचसे निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात हे माहीत असूनही निवडणूक आयोगाच्या संबंधित कार्यवाहीला स्थगिती देण्याची …

Read More »

खालापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सिद्धेश जितेकर

खोपोली : प्रतिनिधी खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अ‍ॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चौगुले व सचिवपदी अ‍ॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या …

Read More »

उतेखोल शाळेचे विद्यार्थी रमले वाचन जागरात

माणगाव : प्रतिनिधी नवरात्र उत्सवात सर्वत्र नृत्य, गाणी व विविध पारंपरिक संस्कृतीचा जागर होत असताना उतेखोल (ता. माणगात) गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी माणगावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात वाचन उपक्रमात रमले आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण देणार्‍या या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.  विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विविध पुस्तकांची ओळख …

Read More »