अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी, तर या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरुवारी (दि.21) पत्रकार परिषदेत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाजाचा जाहीर पाठिंबा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाज बांधवांनी आपले समर्थन देत जाहीर पाठिंबा दिला. जे आपल्या हिंदुत्वाचे संरक्षण करणारे आहेत, जे आपल्या सुखा दुःखात सोबत राहतात आणि सर्व समाजाला न्याय मिळवू देण्यासाठी कटीबद्ध असतात अश्या …
Read More »केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आई गावदेवी चरणी नारळ फोडून करण्यात आला. या वेळी आमदार महेश बालदी यांच्या पत्नी नीता बालदी यांची उपस्थिती लाभली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस …
Read More »आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत व सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी उरण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या विजयासाठी विविध वाड्यांमध्ये जाऊन प्रचार केला. या वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारासाठी मोदीमाल वाडी, तुळशीमाळ वाडी, सवणे आदिवासी वाडी, …
Read More »नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार -संदीप पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
अलिबाग शासकीय कार्यालयात जाऊन प्रचार अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदरसंघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात जाऊन प्रचार केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चित्रलेखा पाटील या मंगळवारी (दि.12) दुपारी 2 वा. च्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा जाहीर
पनवेल : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना माळी समाजातर्फे पाठिंबा देण्यात येत असल्याचे मंगळवारी (दि. 12) पनवेल येथे झालेल्या माळी समाजाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते. भाजप, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातील समाजातील …
Read More »आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. यामध्ये खोपटे गावातील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
Read More »महायुतीकडून पनवेल शहर, खांदा कॉलनीत भव्य बाईक रॅली
* आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी (दि.11) करण्यात आले होते. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर झेंडे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रचाराचा उरणमध्ये झंझावात
उरण : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघातील चिरनेर, कळंबूसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, आवरे आणि गोवठणे उरण पूर्व विभागात आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदार संघातील उरण पूर्व …
Read More »