Breaking News

Monthly Archives: August 2020

पनवेलमध्ये 225 नवे कोरोना रुग्ण

तिघांचा मृत्यू; 130 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 31) कोरोनाचे 225 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 100 रुग्ण …

Read More »

हळूहळू बिगिन अगेन

देशातील कोरोना महामारीचे थैमान अजुनही थांबलेले नाही. रुग्णांचे आकडे अद्याप रोज वाढतच आहेत. कोरोना रुग्णांची ही आकडेवारी काळजी वाढवणारी बाब आहे हे खरेच, परंतु हातावर हात बांधून निमूटपणे बसणे आता कोणालाच परवडणारे नाही. कोरोना विषाणूच्या विरोधात मारे युद्धबिद्ध छेडल्याच्या आविर्भावात भाषणे ठोकायची आणि दुसरीकडे हातावर हात बांधून घरात दडून बसायचे …

Read More »

रायगडात 430 नवे कोरोना पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 31) 430 नव्या कोरोना रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 252 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 225, अलिबाग 64, पेण 49, रोहा 22, कर्जत 20, खालापूर व सुधागड प्रत्येकी 14, उरण नऊ, महाड चार, तळा तीन आणि …

Read More »

राज्यात ई-पासची अट रद्द

मुंबई : राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शासनाने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-4संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली आहेत.

Read More »

सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान

कळंबोली, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांना सोमवारी (दि. 31) प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे …

Read More »

भाजपच्या कोरोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन

ठाणे : प्रतिनिधी – कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपर्‍यात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत चार महिन्यांत केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेतील …

Read More »

भाजप कामगार आघाडीच्या कोकण प्रभारीपदी विनोद शहा

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी प्रदेश संयोजक गणेश ताठे व प्रभारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच कामगार आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली असून यामध्ये कोकण प्रभारी व महाराष्ट्र कामगार आघाडी कार्यकारिणी सदस्यपदी रायगडमधून विनोद शांतीलाल शहा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. मागील तीनवर्षांपासून …

Read More »

पनवेल मनपातील सर्व कर्मचार्यांना कोविड भत्ता द्या -नगरसेविका संतोषी तुपे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेत काम करणार्‍या सर्व कामगारांना कोविड-19 भत्ता देण्याची मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी सोमवारी (दि. 31) झालेल्या महासभेत चर्चेच्या वेळी केली. आपण याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सद्यस्थितीत महापालिकेत ठोक मानधन, ग्रामपंचायत वेतन श्रेणी आणि कंत्राटी कामगार अशा तीन प्रकारांत …

Read More »

विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती आक्रमक

उरण : रामप्रहर वृत्त – जासई श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 30) बैठक झाली. या मिटिंगमध्ये आताच झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे जासई गावातील जवळजवळ 130 ते 135 घरे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्याखाली गेली व त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान …

Read More »

पाच महिन्यांची एकत्रित वीज बिले

महावितरण कंपनीचा ग्राहकांना ‘शॉक’ अलिबाग : प्रतिनिधीमहावितरण कंपनीने पाच महिन्यांचे वीज बिल एकत्रित पाठवून ग्राहकांना ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ बिले आल्याने महावितरणच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शंकेचे निरसन होत नसल्यामुळे महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादही होत आहेत.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. …

Read More »