Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर येथे पार पडली. या सभेनंतर सन २०२६-२०३० या कालावधीसाठी असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. असोसिएशनचे यापूर्वी अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अरुण लखानी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली असून रायगड जिल्ह्यासाठी …

Read More »

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती मंगळवारी (दि.२२) वाशी येथे कर्मवीरांच्या प्रतिमेची रथयात्रा काढून उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री चौगुले, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते …

Read More »

शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना पनवेलमध्ये अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहरातील त्यांच्या पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कर्मवीरांच्या महान शैक्षणिक, सामाजिक आणि समाजोद्धारक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा कायम पुढे नेण्याचा संकल्प करण्यात …

Read More »

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढविण्याबाबत अभ्यास करून ठोस उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार असून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील भजनी मंडळांना साहित्याचे वितरण करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा …

Read More »

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य आणि अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त महापौर निवासस्थानाचे लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१०) झाले. यावेळी त्यांनी महापौर नितीन पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यास भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे व आमदार …

Read More »

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‌‘बाप्पा मोरया‌’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र …

Read More »

समरसता संकल्प अभियानांतर्गत पनवेलमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा गौरव

संत रोहिदास महाराजांच्या कार्याला मान्यवरांकडून उजाळा पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या वतीने संत रोहिदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून समरसता संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत पनवेल शहर मंडळातर्फे शहरातील रोहिदास वाडा येथील समाजमंदिरामध्ये विशेष कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. येथील विविध विकासकामांसाठी तब्बल १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणी याबाबत करंजा सोसायटी येथे …

Read More »

शेल इंडिया मार्केट्स कंपनीच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तशेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल इंडिया मार्केट्स प्रा.लि. कंपनीतील कामगारांचा पुढील चार वर्षांसाठीचा ऐतिहासिक वेतन करार पार पडला. सल्लागार तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.३) या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.या नवीन चार …

Read More »