Breaking News

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता

उरण ः रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघातील 13 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.
यामध्ये राममा 04 नांदगाव ते नांदगाव कातकरवाडी रस्ता, विंधणे प्ररामा 04 ते बोरी बु. रस्ता, रामा 103 ते मुळेखंड रस्ता, भोम ते मोठी जुई रस्ता, रामा 103 ते धुतुम रस्ता, पोयंजे ते मोहपे रस्ता, राममा 04 ते घोसाळवाडी रस्ता, रामा 104 ते माडभुवन रस्ता, रामा 103 बंबावी ते बंबावी कोळीवाडा रस्ता, रामा 107 गुळसुंदे ते आकुळवाडी रस्ता, राममा 4 ते डेरवली रस्ता, कल्हे ते लहूचीवाडी रस्ता, कोप्रोली ते कोप्रोली आदिवासीवाडी रस्ताचा विकास होणार आहे.
या रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यांची मागणी आणि पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या या कामांना ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लवकरच या कामांची निविदा प्रसिद्ध होऊन रस्त्यांच्या विकासकामाला सुरुवात होणार आहे. या मंजुरीबद्दल आमदार महेश बालदी यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply