Breaking News

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले.
पनवेल विधनासभा मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखली गतिमान पद्धतीने विकास होत आहे. त्यानुसार त्यांच्या 40 लाख रुपयांच्या निधीमधून वाजे फाटा ते वाजे गावापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
भूमिपूजनावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील माळी, राजेश भोईर, राजा भालेकर, श्याम भालेकर, रेवण पाटील, प्रधान पाटील, नामदेव पाटील, सुमित पाटील, अंकुश पाटील, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलच्या हिृदय गाणेकरला राष्ट्रीय इन्स्पायर मानक पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमधील इयत्ता …

Leave a Reply