नागोठणे : प्रतिनिधी : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पहिली अंध व्यक्ती म्हणून काम करीत असल्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत सौरऊर्जेवर चालणारी 12 ते 16 उपकरणे आपण तयार तयार केली असून, त्यातील चार पेटंट माझ्या नावावर आहेत. सौरऊर्जेवर चालणारी पहिली शिलाई मशीन आपण तयार केली असून, तरुणांनी अंध किंवा दिव्यांग आहोत, म्हणून कधीही कमीपणा न मानता कार्यरत राहावे, असे आवाहन सागर पाटील यांनी केले.
येथील विद्यार्थी उन्नती संघाच्या वतीने अस्मिता फाऊंडेशन-बोरिवली आणि कॅप्रिग्लोबल कॅपिटल कंपनी-मुंबई यांच्या सहकार्यातून येथील कुंभारआळीतील गणपती-मारुती मंदिराच्या पटांगणात शहरातील सात दिव्यांगाना व्हीलचेअर आणि 11 जणांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. त्या वेळी सागर पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद धाटावकर यांनी, तर सूत्रसंचालन रोहिदास हातलोणकर यांनी केले.
अस्मिताचे विजय कळंबकर, मिलिंद तेंडुलकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त योगिता तांबे, सागर पाटील, अनिल वाघ, अनिल सुतार, राजश्री तळाशीलकर, डॉ. मंजुषा शेवाळे, सुधा वाघ, राजेंद्र घाग (नालासोपारा), कॅप्रीचे राहुल रसाळ, दिव्यांग संघटनेचे एजाज मोहने, संघाचे अध्यक्ष दीपक वाडेकर, तुकाराम खांडेकर, संतोष गायकवाड आदी मान्यवरांसह नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी रियाना सय्यद, कुलसुम कुवारे, प्रणाली भिंगारे, सक्षम शिर्के, नाजनीन कोरतकर, अंकिता राय आणि उमेश कोळी यांना व्हीलचेअर आणि सुनील पिंपळे, शिवशरण निमबर्गा, समीरा बोडेरे, देवीदास ताडकर, अबुबकर मुजावर, अश्विनी धामणे, ज्योती शिर्के, सादिया पाटणकर, अमोल शर्मा, प्रेरणा कडव आणि चेतना जाधव या दिव्यांगाना तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी उन्नती संघाचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.