Breaking News

खोपोलीतील खुनाची रायगड पोलिसांकडून उकल, तिघांना अटक

खोपोली : प्रतिनिधी : खोपोलीत आढळलेल्या एका मृतदेहाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह सोमा नथू वाघमारे (वय 42, रा. कोंडप, ता. सुधागड) या इसमाचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सदर इसम सध्या शिळफाटा येथील दुधडेअरीच्या मागच्या बाजूला राहत होता. त्याची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

सोमा वाघमारे यांचा मृतदेह 03 जून रोजी खोपोलीतील सिद्धार्थनगर येथील पाताळगंगा नदी किनारी सापडला होता. त्याची माहिती मिळताच खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस. पी. येडेपाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्वरित घटनास्थळाला भेट दिली. यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली आणि रायगड पोलिसांच्या पथकांनी तपास सुरू केला व या गुन्ह्याची उकल करून तीन आरोपींना जेरबंद केले. त्यांनी सोमा वाघमारे यांच्याकडील रोख रकमेवरून झालेल्या वादातून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply