
पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील कलंबुसरे येथील आदर्श नवरात्रोत्सव मंडळाने रात्री नवदितांचे कविसंमेलन घेऊन अनोखी रंगत आणली. या कवीसंमेलनात कवी डॉ. आर. बी. राठोड, प्रा. एल. बी. पाटील, कवयित्री जोत्स्ना राजपूत, कवी किशोर पाटील, मधुबन कट्टाचे अध्यक्ष कवी अर्जुन हंडोरे, बाबू पुजारी, भगवान म्हात्रे, भास्कर पाटील, चेतन पाटील, कवियत्री मीनल माळी, मनस्वी माळी, सचिन टोणगे, वसंत राऊत आदी कवी यात सहभागी झाले होते. नामांकित कवी डॉ. आर. बी. राठोड यांनी आईवर आणि बापावर कविता करून उपस्थितांची मने जिंकली. कवयित्री जोत्स्ना राजपूत यांनी ‘भाकरी’वरती कविता करून त्या भाकरीची स्त्रीशी तुलना केली. मनस्वी माळी यांनी हळदीमध्ये गाण्यात येणारा घवला गायला तर प्राध्यापक एल. बी. पाटील यांनी बसणं तर इमामानाणुच यावर कविता सादर केली. कवयित्री रंजना केणी यांनी ’आया व्हती माझी आगरी गावा कया गेली’ या विषयावर कविता सादर केली.