उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
स्टेपआर्ट सामाजिक संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सुनंदा कुमार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुनाडे, कोप्रोली, रानसई आणि वेश्वी अशा आदिवासी वाडीवरील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन पेन्सिल, पट्टी, खोडरबर आणि शार्पनर व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पप्पू सूर्यराव, सचिव सुनील वर्तक, सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित, उपाध्यक्षा स्नेहा गोडे, जीवन डाकी, रवी म्हात्रे, प्रतिक बाईत, अक्षय घरत, अतिष पाटील, सुशांत पाटील, ‘स्टेपआर्ट’च्या नृत्यांगना आणि सारडे विकास मंच, गोल्डन ज्युबली, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळा आणि अंगणवाडीतील शिक्षक, संदीप भोपळे, कोळी, कडू मॅडम, रमणिक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.