Breaking News

उलवे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. प्रमुख वक्ते म्हणून फुंडे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. दिनेश सासवडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उलवे सरपंच कविता खारकर आणि तरघर सरपंच चैताली वाजेकर या उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. जी. पाटील यांनी केले. या वेळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. दिनेश सासवडे यांच्या हस्ते झाले. या निमित्त आदित्य खंदारे आणि श्रुशा गायकवाड या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या जीवन आणि शैक्षणिक कार्याची माहीती आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजेश खारकर, सुनिल ठाकूर, विजय खारकर आणि नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावंड एस. आर., चौधरी बी. आर., पाटील एस. डी. आणि गावंड व्ही. व्ही. आदी शिक्षकांनी सहकार्य केले. व्ही. जी. पाटील यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply