Breaking News

रोटरी क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदी मनोज ठाकूर यांची निवड

उरण ः रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ उरणचा पदग्रहण सोहळा रोटरी स्कूल हॉल, बोरी-उरण येथे उत्साहात झाला. या वेळी रोटरीयन मनोज ठाकूर यांची अध्यक्ष म्हणून तर अ‍ॅड. पराग म्हात्रे यांची सचिव म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रो. राजेश पंजवानी (माजी अध्यक्ष रोटरी क्लब उरण) यांनी आपल्याकडील पदभार मनोज ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी डॉ. अनिल परमार, असिस्टंट गव्हर्नर उमेश लाड, डॉ. अमोल गिरी, डॉ. आशिष काळे, डॉ. भालचंद्र नाखवा, क्रीडा प्रशिक्षक सुबोध दर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमाणपत्र देऊन या वेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये राजेश शहा, प्रसाद मांडेलकर, जगदिश तांडेल, दिनकर नारखेडे, जयवंत ठाकूर, डॉ. मनोज भद्रे, रघु नागवेकर, किशोर पाटील, विजय शेडर्ग, सुनंदा वाघमारे, मीराताई पाटील, प्राजक्ता म्हात्रे, आर्यन मोडखरकर, मी उरणकर ढोल-ताशा पथक यांचा समावेश आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply