उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक करंजा येथील तर नागाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 झाली. त्यातील 55 रुग्ण बरे होऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर 81 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या करंजातील कोरोना रुग्णांची संख्या 121 झाली आहे. त्यातील 72 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि. 22) तालुक्यातील करंजा येथील 19 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तसेच जेएनपीटी बंदरातील एका वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे पॉझिटिव्ह अधिकार्यांच्या सानिध्यात आलेल्या 27 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.