Breaking News

संजू जैसा कोई नही!

हंगामातील पहिल्या शतकासह आयपीएलमध्ये अनोखा विक्रम

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएलच्या 14व्या हंगामात पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा चार धावांनी निसटता पराभव झाला. प्रथम फलंदाजी करीत पंजाबने राजस्थानला 222 धावांचे आव्हन दिले होते,  पण त्यांना 217 धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. यासोबतच त्याने अनोखा विक्रम केला आहे.

वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशीर अशी फलंदाजी केली. कर्णधार म्हणून संजूचा हा पहिलाच सामना होता. त्याने 63 चेंडूंत 119 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील संजूचे हे तिसरे शतक ठरले. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर संजूचा क्रमांक लागतो. विराटने पाच शतक केली आहेत.

कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम संजूच्या नावावर आहे. याआधी पदार्पणात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. त्याने 2018मध्ये 93 धावा केल्या होत्या.

माझ्याकडे शब्द नाही. आम्ही फार जवळ पोहचलो होतो. इतक्या जवळ पोहोचलो पण त्याला पार करू शकलो नाही. मला वाटते की मी शॉट चांगला मारला होता. टायमिंगदेखील चांगले होते, पण झेल पकडला गेला. हा एक खेळाचा भाग आहे.

-संजू सॅमसन, कर्णधार, पंजाब किंग्ज

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply